Tilak Varma six hits cameraman during IPL match Dainik Gomantak
क्रीडा

IPL: Mumbai Indians च्या टिळकने मारलेला बॉल थेट कॅमेरामनला लागला

पहिल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीचा पराभव केला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये शनिवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ आमनेसामने होता, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. (Tilak Varma six hits cameraman during IPL match)

पहिल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 193 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 170 धावा करू शकला आणि सामना 23 धावांनी गमावला. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा (Delhi) संघ केवळ 157 धावा करू शकला.

हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेहही आली होती. मात्र या सामन्यात रोहितला फार काही करता आले नाही. तो अवघ्या 10 धावा करून बाद झाला. रोहित आऊट झाल्यावर रितिका खूपच निराश दिसत होती. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी अदाराही उपस्थित होती.

या सामन्यात मुंबईचा फलंदाज कायरॉन पोलार्डच्या हातातून बॅट सुटली. तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पोलार्डने या सामन्यात 24 चेंडूत 22 धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

टिळक वर्मा शानदार फलंदाजी करत होता. यादरम्यान, मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या डावाच्या 12व्या षटकात टिळकने रियान परागच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला, जो थेट कॅमेरामनला लागला. मात्र, कॅमेरामनला फारशी दुखापत झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT