Tiger Shroff Football Match Dainik Gomantak
क्रीडा

Video: मेस्सी अन् रोनाल्डोला लाजावले असा फुटबॉल मॅचमधील टायगर श्रॉफचा गोल

Tiger Shroff Football Match: टायगर श्रॉफ स्टंट आणि फिटनेसमुळे नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतो.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग टायगर श्रॉफ नेहमीच फिटनेसमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असतो. फिटनेस आणि स्टंटचे त्याचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलिकडेच टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) फुटबॉलच्या मैदानावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील त्याचा गोल दिग्गज खेळाडूंना लाजवेल असा आहे. त्यामुळे या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Tiger Shroff Football Match News)

टायगर श्रॉफला (Tiger Shroff) फिटनेस, स्टंटबाजीसह मैदानावर खेळायलाही आवडतं. अलिकडेच टायगर श्रॉफने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउटवर फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Video) `टायगर श्रॉफ फुटबॉल खेळताना दिसत आहे. सोबतच या सामन्यादरम्यान टायगर श्रॉफने एक गोलसुद्धा केला.

व्हिडिओमधील त्याचा गोल पाहून नेटकरी त्याची तुलना थेट प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी करत आहेत. टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खुप आवडला आहे.

टायगर मार्शल आर्ट देखील शिकलाय. अनेक सिनेमांमध्ये या आर्ट संबंधित स्टंट करताना त्याला पाहिले गेले आहे. टायगरने असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना यश खूप लवकर मिळाले आहे. टायगर श्रॉफ त्यापैकीच एक म्हणता येईल.

टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2' हा चित्रपट रिलीज झाला आहे. आगामी चित्रपट "गणपत" मध्ये टायगर क्रिती सेननसोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट (Movie) येत्या डिसेंबरमध्ये रिलाज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

SCROLL FOR NEXT