Viral Vidio of Japan's Fans Dainik Gomantak
क्रीडा

Viral Vidio of Japan's Fans: जपानच्या खेळाडुंनी सामना जिंकला; तर चाहत्यांनी जिंकली मने...

जर्मनीला पराभूत केल्यानंतर जपानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये केली 'अशी' कृती

Akshay Nirmale

Viral Vidio of Japan's Fans: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी जपानने जर्मनीला पराभवाचा धक्का दिला होता. 2-1 अशा गोलफरकाने झालेल्या या धक्कादायक पराभवाननंतर स्टेडियममध्ये जपानच्या चाहत्यांनी केलेले कृत्य आता चर्चेत आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (FIFA World Cup 2022)

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या जपानच्या सर्व चाहत्यांनी सामना संपताच चक्क स्टेडियमची स्वच्छता सुरू केली. त्यांनी प्लॅस्टिकचा कचरा कॅरीबॅगमध्ये भरून एकत्र केला. याचा व्हिडिओ फिफाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. आणि फुटबॉलप्रेमींकडून या कृतीचे कौतूक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे, आणि त्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

जपान-जर्मनी सामना अत्यंत उत्कंठावर्धक झाला. दोन्ही संघांनी विजयासाठी शक्य ते प्रयत्न केले. पण अखेर जपाननेच बाजी मारली. विशेष म्हणजे जर्मनीने एक गोल करून आघाडी घेतली होती. पण तरीही जपानने मागाहून येत जर्मनीवर दोन गोल केले होते. या प्रत्येकवेळी स्टेडियममधील जपानच्या पाठिराख्यांनी संघाला मोठा प्रतिसाद देत संघाचा हुरूप वाढवला होता. पण, सामना संपल्यानंतर त्यांनी स्टेडियममध्ये पडलेला कचरा उचलून एकत्र केल्यावर आता जपानच्या पाठिराख्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. प्रत्येकजण जपानच्या चाहत्यांचे कौतूक करत आहे.

फिफाने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला काही वेळातच 82 हजारहून अधिक लोकाच्या लाईक्स मिळाल्या होत्या आणि 16 हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट केले होते. या ट्विटवर ट्विटर युजर्सनी जपानच्या चाहत्यांचे कौतूक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT