Jaydev Unadkat and N Jagadeesan Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: 'या' तीन भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझींची असेल करडी नजर

आयपीएल लिलावात चांगली पंसती मिळू शकणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या

Pranali Kodre

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीगच्या १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावात तब्बल ४०५ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात २७३ भारतीय खेळाडू आहेत. पण त्यातही आता कोणत्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान या लेखात आपण ती अशा भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांना या लिलावात चांगली मागणी असू शकते.

एन जगदीशन -

चेन्नई सुपर किंग्स संघाने यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशनला आयपीएल २०२३ लिलावापूर्वी संघातून मुक्त केले. त्यामुळे तमिळनाडूचा हा खेळाडू लिलावात उतरला आहे. दरम्यान, जगदीशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

त्याने नुकतेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग ५ शतके झळकावली होती. त्यामुळे त्याच्यावर सर्वच फ्रँचायझींचे लक्ष राहिल. त्यातही गुजरात टायटन्स वृद्धिमान साहाचा पर्याय म्हणून जगदीशनवर मोठी बोली लावू शकतात.

मुकेश कुमार

बंगालचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने गेल्या काही महिन्यांत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला भारतीय अ संघातही संधी मिळत आहेत.

सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातही त्याची निवड झाली होती. त्याने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही बंगालसाठी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावरही अनेक फ्रँचायझींची नजर असेल.

जयदेव उनाडकट

नुकतेच भारताच्या कसोटी संघात १२ वर्षांनी पुनरागमन केलेला जयदेव उनाडकट नेहमीच आयपीएल लिलावात चर्चेचा विषय असतो. त्याला यापूर्वीही अनेकदा लिलावात कोट्यावधींची बोली लागलेली आहे.

दरम्यान, त्याची गेल्या काही वर्षांत सौराष्ट्र संघाकडून चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीतील विविधता लक्षात घेता, अनेक फ्रँचायझी त्याला या लिलावातही पसंती देताना दिसू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT