Sourav Ganguly  Dainik Gomantak
क्रीडा

सौरव गांगुली होणार तृणमुल कॉंग्रेसचे खासदार ?

ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचे संबंध चांगले असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि BCCIचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना तृणमुल कॉंग्रेस (TMC) राज्यसभेवर पाठविण्याची तयारी करीत असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात आहे. यापूर्वी सौरव गांगुलीच्या वाढदिवशी मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर गांगुलीबद्दलच्या या चर्चेल उधान आले आहे. (There is talk of Sourav Ganguly becoming a Trinamool Congress MP)

भाजपा बर्‍याच दिवसांपापासून सौरवला आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी सौरव यांना थेट ममतांच्या विरोधात उभे करण्याचा भाजपने जोरदार प्रयत्न केला होता, पण सौरव यांनी स्पष्टपणे म्हटले होते की सध्या राजकारणात येण्याची आपली कोणतीही ईच्छा नाही. तर दुसरीकडे सौरव गांगुलींचे ममता बॅनर्जीं बरोबर चांगले संबंध आहेत. सौरवला बंगालच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनविण्यात ममता बॅनर्जींची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

यावर्षी जानेवारीत सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा ममता त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयातही गेल्या होत्या. आता अशी असा अंदाज देखील वर्तवला जात आहे की, राज्यसभेच्या सदस्याबाबत ममता यांनी सौरवशी चर्चा केली असल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Crime: 'पोलिस नक्की कुणाला संरक्षण देतात'? मोरजी खून प्रकरण; आप, कूळ-मुंडकार मुख्य संशयिताच्या अटकेसाठी आक्रमक

Edberg Pereira Case: 'एडबर्ग' मारहाण प्रकरणाचे गूढ वाढले! शिस्तभगांची कारवाई झालेला हवालदार आजारी सुट्टीवर; चर्चांना उधाण

मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Goa Today's News Live: कचरा कामगार वेतन घोटाळा! सांताक्रूझ ग्रामपंचायतीचा सरकारी सेवक आणि पंच सदस्याविरुद्ध ACB कडून FIR दाखल

SCROLL FOR NEXT