World Table Tennis Dainik Gomantak
क्रीडा

World Table Tennis स्पर्धेच्या पात्रता फेरीला सोमवारपासून सुरवात

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

World Table Tennis भारतात प्रथमच होणाऱ्या वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीला सोमवारपासून (ता. 27) पणजीजवळील ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरवात होत आहे, त्यावेळी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष राहील.

स्पर्धेतील दोन दिवसीय पात्रता फेरीनंतर मुख्य फेरीतील सामने बुधवारपासून (ता. १) खेळले जातील. पात्रता फेरीत पुरुष गटात 15, तर महिला गटात 13 भारतीय खेळाडू खेळतील. एकेरीत पुरुष गटात हरमीत देसाई, तर महिलांत जागतिक क्रमवारीत 84 व्या स्थानी असलेली अर्चना कामत या भारतीय खेळाडूंना मुख्य फेरीत जागा मिळविण्याची संधी असेल.

पुरुष व महिला गटातून प्रत्येकी आठ खेळाडू मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. पुरुष, महिला, मिश्र दुहेरीतील पात्रता फेरीतून प्रत्येकी चार जोड्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. दुहेरीत एकूण 17 भारतीय जोड्या मैदानात उतरतील.

आश्वासक भारतीय खेळाडू

पात्रता फेरीत खेळणारा 22 वर्षीय मनुष शाह जागतिक क्रमवारीत सध्या 109 व्या स्थानी आहे. 2021 मध्ये त्याने इक्वेडोर खुली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. 16 वर्षीय पृथा वर्टीकर 467 क्रमांकावर आहे. तिची सीनियर गटातील ही पहिलीच डब्ल्यूटीटी स्पर्धा आहे.

पुरुष गटातील 22 वर्षीय चष्मेधारी मानव ठक्कर जागतिक क्रमवारी 127 व्या क्रमांकावर आहे. हरमीत देसाईव्यतिरिक्त सनिल शेट्टी हा पुरुष पात्रता फेरीतील अनुभवी खेळाडू आहे. महिलांत अर्चना कामतसह अहयिका मुखर्जी, सुतिर्था मुखर्जी या प्रमुख खेळाडू आहेत.

पात्रता फेरीतील प्रमुख परदेशी खेळाडू

जपानचा जागतिक क्रमवारीत 73 व्या क्रमांकावरील मिझुकी ओईकावा, 95 व्या क्रमांकावरील कोरियाचा कांग डाँगसू यांच्यासह फ्रान्सचा 16 वर्षीय फेलिक्स लेब्रू हे पात्रता फेरीतील काही प्रमुख खेळाडू आहेत. महिलांत 72 व्या स्थानावरील रुमानियाची ॲडिना डियोकोनू, 85 व्या क्रमांकावरील हाँगकाँगची झू चेंगझू, भारतीय वंशाची फ्रेंच खेळाडू प्रिथिका पावाडे यांच्याकडे लक्ष असेल.

तीस देशांतील 200 खेळाडू

डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर स्पर्धेत 30 देशांतील एकूण 200 टेबल टेनिसपटूंचा सहभाग आहे. यामध्ये पुरुष व महिला एकेरीतील मुख्य फेरीत जागतिक क्रमवारीतील पहिल्या वीस खेळाडूंत असलेल्या काही मातब्बर खेळाडूंचाही सहभाग आहे. मुख्य फेरीतील मा लाँग व चेन मेंग सध्याचे ऑलिंपिक विजेते या स्पर्धेनिमित्त भारतात प्रथमच खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

SCROLL FOR NEXT