New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

IND VS NZ: नंबर वन कसोटी संघांचा लाजिरवाणा विक्रम, जाणून घ्या

मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा (New Zealand) संघ अवघ्या 62 धावांत गारद झाला.

दैनिक गोमन्तक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) विजेता, जगातील नंबर 1 संघ असलेल्या न्यूझीलंडच्या (New Zealand) नशिबाला पराभवाचं ग्रहण लागलं आहे. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 62 धावांत गारद झाला. टीम इंडियासमोर (Team India) किवी संघ 28.1 षटकापर्यंतच क्रीझवर दम धरु शकला. एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. किवी संघाने शरणागती दरम्यान काही अवांछित विक्रम केले, तर दुसरीकडे अश्विन आणि कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. जाणून घ्या न्यूझीलंडच्या शरणागतीबद्दलच्या 5 गोष्टी.

मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला, ही भारतीय मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम केवळ भारताच्या नावावर होता, ज्याने 34 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अवघ्या 75 धावा केल्या होत्या. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघही 79 धावांत गारद झाला होता.

न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील ही सहावी नीचांकी धावसंख्या आहे. त्याच वेळी, कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध 62 धावा ही न्यूझीलंडची सर्वात खराब कामगिरी आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला 62 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताविरुद्ध 79 आणि इंग्लंडविरुद्ध 81 धावांत आटोपला होता.

रविचंद्रन अश्विनने 50 व्यांदा एका डावात 4 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय ठरला आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत 66 वेळा एका डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने 2021 मध्ये 48 कसोटी विकेट घेतल्या आहेत. तर यावर्षी तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT