U19 India Team Dainik Gomantak
क्रीडा

U19 Asia Cup स्पर्धेत ख्रिसमसच्या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार !

बीसीसीआयच्या (BCCI) ज्युनियर निवड समितीने यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक (U19 Asia Cup) स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

बीसीसीआयच्या (BCCI) ज्युनियर निवड समितीने यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक (U19 Asia Cup) स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. T20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. टी-20 विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून (India vs Pakistan) पराभव पत्करावा लागला, त्यानंतर तो स्पर्धेतूनच बाहेर पडला. अशा स्थितीत ज्युनियर संघ बदला पूर्ण करेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

यूएईमध्ये होणाऱ्या या आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश (Bangladesh), श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, कुवेत आणि यूएईचे संघ सहभागी होत आहेत. या 8 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई आहेत. दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश, कुवेत आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ पुढील फेरीत जातील, ज्यामध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील.

भारत 23 डिसेंबरपासून मोहीम सुरु होणार

पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अंडर-19 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत, ही स्पर्धा सर्व संघांसाठी खूप महत्त्वाची आहे, जेणेकरुन संघांना त्यांच्या संयोजनाची आणि तयारीची चाचणी घेता येईल. भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचवेळी, 25 डिसेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धचा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 1 जानेवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक

23 डिसेंबर – भारत वि UAE

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान

बांगलादेश विरुद्ध नेपाळ

24 डिसेंबर – श्रीलंका विरुद्ध कुवेत

25 डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान

बांगलादेश विरुद्ध कुवेत

अफगाणिस्तान वि UAE

२६ डिसेंबर – श्रीलंका विरुद्ध नेपाळ

27 डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

पाकिस्तान वि UAE

28 डिसेंबर – नेपाळ विरुद्ध कुवेत

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

30 डिसेंबर – 1 ली आणि दुसरी उपांत्य फेरी

1 जानेवारी - अंतिम

आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड

भारतीय संघाने अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत संघाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. यावेळी संघाची कमान यश धुलकडे देण्यात आली आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकापूर्वी यशकडे कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

संघ : हरनूरसिंग पन्नू, अंगकृष्ण रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना ( W.K.), आराध्या यादव (W.K.), राजनगड बावा, राजकुमार हंगरकर, गरव सांगवान, रवी कुमार, ऋषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT