Winner The King's School Team
Winner The King's School Team Dainik Gomantak
क्रीडा

Dilip Sardesai Trophy : किंग्स स्कूल राज्यस्तरीय विजेते; सामंत मेमोरियल हायस्कूलवर मात

किशोर पेटकर

शानदार अर्धशतके नोंदविलेल्या आराध्य गोयल आणि गौरीश साजिलाल यांनी दिलेल्या 135 धावांच्या सलामीमुळे सां जुझे द आरियलच्या द किंग्स स्कूलने दिलीप सरदेसाई करंडक 16 वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद सहजपणे पटकावले. सोमवारी अंतिम लढतीत त्यांनी पर्वरीच्या एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूलला सहा विकेट राखून हरविले.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धेतील सामना कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. सामंत मेमोरियल हायस्कूलच्या सलामीवीर मिहीर कुडाळकर याने झुंजार नाबाद शतक ठोकले, पण त्याला इतर सहकाऱ्यांकडून चांगली साथ मिळाली नाही, त्यामुळे त्याच्या संघाला 201 धावांचीच मजल मारता आली.

मिहीरने 107 चेंडूंत 15 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. नंतर आराध्य (६१ धावा, ५९ चेंडू, ८ चौकार) व गौरीश (७१ धावा, १०० चेंडू, ११ चौकार) यांनी २१.५ षटकांत दमदार भागीदारी केल्यामुळे किंग्स स्कूलचे पारडे जड राहिले व त्यांनी चार विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले. आराध्य याला स्पर्धेचा मानकरी, तर गौरीशला अंतिम सामन्याचा मानकरी पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक

एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूल ः ४० षटकांत सर्वबाद २०१ (मिहीर कुडाळकर नाबाद १०५, जय जग्गल ३५, तन्मय वालावलकर १०, शमिक कामत १-२६, व्यंकट चिगुरुपती ४-४६, आराध्य गोयल २-२९, जय कांगुरी १-३४) पराभूत विरुद्ध द किंग्स स्कूल ः ३५ षटकांत ४ बाद २०२ (आराध्य गोयल ६१, गौरीश साजिलाल ७१, शमिक कामत १४, व्यंकट चिगुरुपती नाबाद १२, ईशान होडारकर नाबाद १२, राजदीप पाटील १-४६, मिहीर कुडाळकर १-४५, अर्णय आपटे १-४०, अजिंक्य भातकांडे १-९).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT