Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

माजी फिरकीपटूने केला मोठा खुलासा, सिराजच्या यशात या दिग्गजाचा हात

मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त संघाची (Team India) बेंच स्ट्रेंथही चांगली आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाची (Team India) गोलंदाजी अधिक मजबूत झाली असल्याची सर्वांनाच जाणीव आहे. मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त संघाची बेंच स्ट्रेंथही चांगली आहे. यातूनच युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) उदयास आला आहे. सिराजने अलीकडेच लॉर्ड्स कसोटीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात तितक्याच विकेट घेत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटीमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून क्रिकेटप्रेमींकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जात आहे. भारताचे माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी म्हटले आहे की, सिराजच्या यशात भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची महत्त्वाची भूमिका आहे.

शिवरामकृष्णन म्हणाले की, भरतने हैदराबादमध्ये प्रशिक्षणादरम्यान सिराजची प्रतिभा ओळखली होती. शिवरामकृष्णन पुढे म्हणाले की, सिराज त्या गोलंदाजांपैकी एक आहे ज्यांना विकेट घेण्याची भूक आहे आणि भरतने आपल्या अफार मेहनतीतून भारतीय गोलंदाजाला बळ दिले आहे.

अजून खूप शिकायचे आहे

माध्यमाशी बोलताना शिवरामकृष्णन म्हणाले, "सिराजच्या यशाचे बरेच श्रेय भरताला जाते. हैदराबादचे प्रशिक्षक असताना त्यांनी सिराजची प्रतिभा ओळखली आणि त्याला घडविण्यास सुरुवात केली. जोपर्यंत सिराजला विकेट घेण्याची भूक आणि शिकण्याची प्रचंड इच्छा आहे. भरत यांनी त्याची क्षमता जोखली."

सिराजने भरतने सांगितले तेच केले

शिवरामकृष्णन म्हणाले की, काही जण प्रशिक्षकाच्या सल्ल्यावर शंका घेऊ शकतात, पण सिराज यांनी भरतचा दृष्टिकोन मनापासून स्वीकारला. ते म्हणाले की, सिराज भारतला आपला गुरू मानतो. ते पुढे म्हणाले, “सिराजने भरतचे पालन केले, त्याने जे सांगितले ते केले. काही लोक त्यावर शंका घेऊ शकतात, ते बरोबर की अयोग्य यावर शंका घेऊ शकतात, परंतु सिराजने भरतला आपले गुरू मानले आणि जे सांगितले ते केले. भरतने आपला अनुभव संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT