नीरजला चोप्राला भाल्याची प्रतिकृती भेट देताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Neeraj Chopra Stadium)  Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra Stadium: खेळाच्या विकासासाठी मदत पुरवण्यास केंद्र सरकार बांधील

पुणे (Pune) येथील लष्कराच्या क्रीडा मैदानाचे (Military sports ground) 'नीरज चोप्रा स्टेडियम' असे नामकरण (Neeraj Chopra Stadium)

Dainik Gomantak

Neeraj Chopra Stadium: देशामध्ये खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ती मदत केंद्र सरकार पुरवण्यासाठी बांधील आहे. आणि देशातील प्रत्येक खेळाडूला याविषयी माहिती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी पुणे येथे केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज पुणे येथे लष्कराच्या क्रीडा संस्थेस भेट दिली त्यावेळी ऑलम्पिक (Tokyo Olympics 2020) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोळा खेळाडूंचा गौरव करण्यात आला. लष्कराच्या या क्रीडा मैदानाचे नीरज चोप्रा (Neeraj Chopra) स्टेडियम असे नामकरणही करण्यात आले.

भारताने देशात खेळ वाढण्यासाठी कधीच व कोणतीच तडजोड केली नाही आणि करणारही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः क्रीडाप्रेमी असून ते खेळाला प्रोत्साहन देण्यात ही सर्वांच्या पुढे असतात असेही म्हणाले.

देशातील राज्य सरकारी खेळावर घेत असलेल्या मेहनतीचे कौतुकही राजनाथ सिंह यांनी केले. सांघिक आणि वैयक्तिक खेळाला प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे. व राज्य सरकारही याबाबतीत मागे नाही असे राजनाथ सिंह म्हणाले.

पुणे येथे झालेल्या या गौरव सोहळ्यात तरुणदीप राय, प्रवीण जाधव (तिरंदाज), अमित कुमार, मनिष कौशिक, सतीश कुमार(बॉक्सिंग), सी के कुटप्पा, छोटेलाल यादव (बॉक्सिंग प्रशिक्षक), दीपक पूनिया (कुस्ती), अरुणलाल जाट, अरविंद सिंग (रोइंग), विष्णू सर्वानन (सेलिंग) व निरज चोप्रा या खेळाडूंचा गौरव करण्यात आला यावेळी नीरजला भाल्याची प्रतिकृती भेट देण्यात आली या कार्यक्रमामध्ये लष्कर प्रमुख एम नरवणे सुद्धा उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इबोला संसर्गाबाबत केंद्र सरकारकडून हेल्थ ॲडव्हायझरी जारी, देशातील सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर कडक स्क्रिनिंगचे आदेश

Goa Weather: 48 तास महत्त्वाचे! दोन दिवस कोसळणार पाऊस; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Odisha Crime: ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना! जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार; एका महिलेसह तिघे अटकेत

Manoj Parab Resign: राज्याच्या राजकारणात खळबळ! मनोज परब यांनी दिला 'आरजीपी'चा राजीनामा

Goa politics: सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मडगाव पालिका बैठक, सरदेसाईंच्या प्रस्तावित विकासकामांवरून वाद

SCROLL FOR NEXT