Team India Dainik Gomantak
क्रीडा

भारताच्या दिग्गज विकेटकीपरची जागा घेणार धाकड खेळाडू

टीम इंडीयाचा अनुभवी विकेटकिपर वृद्धिमान साहाने बंगालच्या रणजी ट्रॉफी मोहिमेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडीयाचा (Team India) अनुभवी विकेटकिपर वृद्धिमान साहाने बंगालच्या रणजी ट्रॉफी मोहिमेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 37 वर्षीय वृद्धिमान सध्या जगातील सर्वोत्तम विकेटकीपरपैकी एक आहे. 4 मार्चपासून श्रीलंका विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होणार नाही, असे भारतीय संघाच्या नवीन संघ व्यवस्थापनाने राष्ट्रीय निवड समितीला सांगितले आहे.

दरम्यान, ऋषभ पंत (Rishabh Pant) हा संघ व्यवस्थापनाचा आवडता विकेटकिपर असून आंध्र प्रदेशच्या श्रीकर भरत (केएस भरत) याने न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत दमदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत साहाच्या जागी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत श्रीकर भरतला संधी देण्याचा संघ व्यवस्थापन विचार करत आहे. श्रीकर भरतने आंध्रप्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपल्या खेळाचे जबरदस्त प्रदर्शन दाखवले होते. तसेच, या प्रकरणाशी परिचित असलेल्या बीसीसीआयच्य सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'संघ व्यवस्थापनात उपस्थित असलेल्या लोकांनी रिद्धिमानला स्पष्टपणे सांगितले आहे की त्याला पुढे जायचे असून ऋषभ पंतसोबत काही नवीन बॅक-अप (पर्याय) तयार करायचे आहेत.'

टीम इंडियाला पंतशिवाय पर्याय शोधावे लागतील

सूत्रानुसार, 'श्रीलंका कसोटी मालिकेसाठी श्रीकर भरतला टीम इंडियामध्ये स्थान देण्याची वेळ आली असून साहाची निवड होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. रिद्धिमानने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष अभिषेक दालमिया आणि संयुक्त सचिव स्नेहाशिष गांगुली यांना 'वैयक्तिक कारणांमुळे' या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे कळवले आहे.

रिद्धिमान साहाने भारतासाठी 40 कसोटी सामन्यांमध्ये तीन शतकांच्या मदतीने 1353 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30 पेक्षा कमी राहिली आहे. मात्र, त्याने 92 कॅच आणि 12 स्टंपिंगसह 104 बळी घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT