Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India New Jersey: श्रीलंका मालिकेपूर्वी टीम इंडियाची बदलली जर्सी, नवीन ड्रेसमध्ये...

IND vs SL: टीम इंडिया 2023 मधील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. 3 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Team India New Jersey: टीम इंडिया 2023 मधील पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. 3 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत टीम इंडिया एका नव्या टायटल स्पॉन्सरसोबत मैदानात उतरणार आहे, ज्याचे फोटोही समोर आले आहेत. भारतीय संघाच्या जर्सीचा टायटल स्पॉन्सर आता एमपीएलऐवजी किलर ब्रँड बनला आहे. टीम इंडिया आता किलर ब्रँडच्या लोगोची जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, मॅजिकल स्पिनर यजुवेंद्र चहलने (Yajuvendra Chahal) टीम इंडियाच्या नवीन जर्सीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये किलर ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या T20 मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाची कमान सांभाळत आहे, तर सूर्यकुमार यादवला या संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

तसेच, या मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1st T20) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT