Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC Rankings मध्ये टीम इंडियाचा जलवा, या बाबतीत ठरली जगातील पहिली टीम

टीम इंडियाची शान कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

International Cricket: टीम इंडियाची शान कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी ICC क्रमवारीत अव्वल 3 मध्ये स्थान मिळवणारा जगातील एकमेव क्रिकेट संघ ठरला आहे. भारताशिवाय कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ICC क्रमवारीत अव्वल 3 मध्ये असलेला दुसरा कोणताही संघ नाही.

दरम्यान, भारतीय संघ (Team India) सध्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या, कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे, भारतीय संघ हा एकमेव संघ आहे, ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 3 मध्ये स्थान मिळवले आहे. कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीम आधीच टॉप 3 मध्ये होती, मात्र मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या (England) वनडे मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम वनडेमध्येही टॉप 3 मध्ये पोहोचली आहे.

एकेकाळी, भारतीय संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पहिल्या स्थानावर होता, परंतु मध्यंतरीच्या वर्षांत, संघाने फार कमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामुळे संघाची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती, मात्र आगामी काळात संघाला या फॉरमॅटमध्ये अनेक सामने खेळायचे असून अशा स्थितीत संघाला पुढे जाण्याची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT