संघातील खेळाडू त्याला खूप मिस करत आहेत, खुद्द कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) ही गोष्ट सांगितली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

T-20 World Cup: टीम इंडिया करतेय 'गब्बर'ला मिस, विराटचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

शिखर धवनची (Shikhar Dhawan) नक्कल करणार विराटचा (Virat Kohli) हा 30 सेकंदाचा मजेशिर व्हिडिओत त्याने तो आणि संघातील इतर खेळाडू शिखरला मिस करत असल्याचे दिसत आहे. टी 20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2021) निवडलेल्या संघात शिखर धवनला संधी मिळाली नाही.

दैनिक गोमन्तक

युएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) 17 ऑक्टोबरपासून टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2021) सुरूवात झाली आहे. अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा (Team India) आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध होणार आहे. यावेळी सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) टीम इंडियात स्थान मिळाले नाही. पण तरी संघातील खेळाडू त्याला खूप मिस करत आहे. खुद्द कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) ही गोष्ट सांगितली आहे.

विराट कोहलीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो शिखर धवनची नक्कल करताना दिसत आहे. विराटच्या हातात बॅट आहे आणि त्याने गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट घातला आहे. विराट मिमिक्री करताना धवनसारखा हात लांब करतो, मग त्याच्यासारखी बॅट धरतो आणि बॉल सोडण्याचा सराव करतो.

कोहलीने 30 सेकंद हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, मिमिक्री करण्यापूर्वी विराट यात म्हणतो, मी विराट कोहली आहे, मी शिखर धवनची नक्कल करणार आहे. कारण मी त्याला खूप मिस करत आहे. हे खूप मजेदार आहे.

धवन-रोहित यांच्या जोडीने सर्वाधिक सलामी दिली

टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टी -20 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा सलामी केली आहे. दोघांनी 52 सामन्यांमध्ये भारतासाठी सलामी दिली. या दरम्यान त्यांनी 33.51 च्या सरासरीने 1743 धावा केल्या. त्यांनी मिळून 210.3 षटके खेळली. त्याच्या नंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांनी 13 सामन्यांत 45.07 च्या सरासरीने 586 धावा केल्या. यात त्यांनी 62.1 षटके खेळली आहेत.

टी 20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात शिखर धवनला संधी मिळाली नाही. लोकेश राहुल त्याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तिसरा सलामीवीर म्हणून युवा फलंदाज ईशान किशनची निवड झाली आहे. ईशान यष्टीरक्षक देखील आहे. धवनने आतापर्यंत 68 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT