KL Rahul & Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: भारतीय संघांची दिवाळी गोड

अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा (India v Afghanistan) 66 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमन्तक

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताने अखेर विजयाची चव चाखली. अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानचा (India v Afghanistan) 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 210 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने 144 धावा केल्या. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माने सर्वाधिक 74 धावा केल्या. केएल राहुलनेही 69 धावांची खेळी खेळली. या दोन फलंदाजांमध्ये 140 धावांची भागीदारी झाली, जी T20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारतासाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. रोहित-राहुलशिवाय हार्दिक पंड्याने नाबाद 35 आणि ऋषभ पंतने नाबाद 27 धावा केल्या.

गोलंदाजीत मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. अश्विनने 4 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली. अश्विनने 4 षटकात केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारत 2 गटात चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून त्याचा निव्वळ रनरेट आता सकारात्मक आहे. भारताचा निव्वळ रनरेट +0.073 असून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या पाठीमागेच आहे. गटातील 4 विजयांसह पाकिस्तानचा संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

SCROLL FOR NEXT