Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास, हा 'महा रेकॉर्ड' केला आपल्या नावावर

T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने T20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने T20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात विराटने 16 वी धाव पूर्ण करताच एक मोठा विक्रम नोंदवला. विराट कोहली आता T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. T20 विश्वचषकात कोहलीच्या आता एकूण 1065 धावा झाल्या आहेत.

त्याने 16 धावा करत हा 'महा रेकॉर्ड' केला

विराट कोहलीने (Virat Kohli) श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेचा विश्वविक्रम मोडला आहे. महेला जयवर्धनेने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) सर्वाधिक 1016 धावा केल्या होत्या, मात्र आता टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने त्याचा विश्वविक्रम मोडला आहे.

विराट कोहलीने T20 विश्वचषकात इतिहास रचला

विराट कोहलीने आता T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 1065 धावांची नोंद केली आहे. श्रीलंकेचा (Sri Lanka) दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आता 1016 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल 965 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. विराट कोहली (भारत) - 1065 धावा

2. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1016 धावा

3. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 965 धावा

एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 463 सामन्यात 14562 धावा

2. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) - 614 सामन्यात 11915 धावा

3. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामन्यात 11902 धावा

4. विराट कोहली (भारत) - 358 सामन्यात 11250 धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT