धोनीची (Dhoni) मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तो लवकरच प्रशिक्षक होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली.
धोनीची (Dhoni) मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तो लवकरच प्रशिक्षक होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली. Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: कॅप्टन कूल होणार का टीम इंडियाचा प्रशिक्षक?

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2021 साठी भारतीय संघाची (Indian Team) बुधवारी (8 ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार असून, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा उपकर्णधार असेल. टीम इंडियासोबत मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावाची घोषणा करण्यात आली. तो यूएईमध्ये टीम इंडियासोबत असेल. धोनीची मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तो लवकरच प्रशिक्षक होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली.

मेंटॉर म्हणून धोनीचा नक्की रोल काय असेल ?

एमएस धोनीच्या (MSD) नेतृत्वाखाली भारताने टी -20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकली. एमएस धोनी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली टी -20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला विजय मिळवून दिले आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला एमएस धोनी आता टीम इंडियामध्ये मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. एक मार्गदर्शक म्हणून, तो भारतीय संघाला त्याच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी तो संघासोबत असेल, आणि संघाला मार्गदर्शन करेल. तसेच त्याच्या अनुभवाचा युवा क्रिकेटपटूंना फायदा होणार आहे.

MSD भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक असेल का?

आता मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, रवी शास्त्री यांच्यानंतर एमएस धोनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक रवी शास्त्री टी -20 विश्वचषकानंतर पद सोडू शकतात. त्याच वेळी, राहुल द्रविडने एनसीए (नॅशनल क्रिकेट अकॅडमी) च्या प्रमुख पदासाठी अर्ज केला तेव्हा त्याचे नाव प्रशिक्षक पदाच्या चर्चेतून दूर झाले. आता एमएस धोनीला टीम इंडियाचे मार्गदर्शक बनवण्यात आल्याने, प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, धोनी भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक असेल का?

मात्र, सध्या धोनी प्रशिक्षक होण्याबाबत काहीही सांगता येणार नाही. धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएल संपल्यानंतर 2 दिवसांनी टी -20 विश्वचषक सुरू होईल, त्यामुळे त्याने यूएईमध्ये संघासोबत राहावे अशी मंडळाची इच्छा आहे. पण प्रशिक्षक म्हणून तो शास्त्रींची जागा घेईल का, हे आताच सांगणे कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT