Mohammad Rizwan Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: मोहम्मद रिझवानने 1000 धावा करत इतिहास रचला

मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एका वर्षात 1000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम केला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा (Pakistan) यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) टी20 मध्ये सलामीला सुरुवात केल्यापासून त्याच्या बॅटने धावांची सरबत्तीच लावली आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकातही रिझवानच्या बॅटने धमाल करत उपांत्य फेरीच्या सामन्यात या आक्रमक फलंदाजाने अर्धशतक झळकावण्याबरोबरच इतिहासही रचला.

मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यात एका वर्षात 1000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम केला. हा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. रिझवानपाठोपाठ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा क्रमांक लागतो, ज्याने यावर्षी 826 टी-20 धावा केल्या आहेत.

मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एका वर्षात 1000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम केला. हा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. रिझवानपाठोपाठ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा क्रमांक लागतो, ज्याने यावर्षी 826 टी-20 धावा केल्या आहेत.

1902 मध्ये क्लेम हिलने कसोटीमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करण्याचा विक्रम केला होता. 1983 मध्ये डेव्हिड गवारने एका वर्षात 1000 एकदिवसीय धावा केल्या होता. आता T20 मध्ये हा विक्रम रिझवानच्या नावावर झाला आहे. मोहम्मद रिझवान जेव्हा मधल्या फळीत खेळायचा तेव्हा 6 वर्षात त्याच्या नावावर एकही टी-20 अर्धशतक नव्हते. रिझवानने पहिल्या 10 टी-20 सामन्यात केवळ 106 धावा केल्या होत्या. पण आता रिझवानने एका वर्षात 1000 टी-20 धावा केल्या आहेत. यासोबतच मोहम्मद रिझवानने बाबर आझमसोबत विश्वविक्रमही केला. दोन्ही फलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात 71 धावांची भागीदारी केली आणि या स्पर्धेत दोघांनी मिळून 402 धावांची भर घातली. हम्माद रिझवान आणि बाबर आझम यांनी 21 डावात 1240 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये 5 शतकी भागीदारी झाली आहे. याशिवाय दोघांनी 4 अर्धशतकी भागीदारीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT