Suryakumar Yadav and Deepak Chahar 
क्रीडा

IND vs AUS: पहिलीच मालिका जिंकल्यानंतर कॅप्टन सूर्या खुश; म्हणाला, 'सामन्याआधी आम्ही...'

Suryakumar Yadav: कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत विजय निश्चित केल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय संघाच्या यशामागील प्लॅनचा खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav reacted on India's win against Australia in 4th T20I at Raipur:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) पार पडला. रायपूरला झालेल्या या सामन्यात भारताने 20 धावांनी विजय मिळवला. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारने संघाचे कौतुक केले आहे.

या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलनेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चौथ्या टी20 सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना अवघ्या 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याचेही सूर्यकुमारने कौतुक केले आहे.

सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, 'नाणेफेकीव्यतिरिक्त सर्वकाही चांगले झाले. खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, जी आमच्यासाठी महत्त्वाची होती. आम्ही सामन्यापूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा केली होती की मैदानात जाऊन स्वत:ला व्यक्त करायचे आणि निडर रहायचे.'

'मला अक्षरला नेहमीच दबावात टाकायला आवडते आणि त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते अविश्वसनीय होते. अखेरच्या षटकांवेळी यॉर्कर्स टाकण्याची योजना होती आणि पाहा काय झाले आहे.'

दरम्यान, सूर्यकुमार पहिल्यांदाच या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याने आता ही मालिका कर्णधार म्हणून जिंकलीही आहे.

दरम्यान, सूर्यकुमारचीही या मालिकेतील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात 80 धावा केल्या होत्या, तर नंतरच्या दोन सामन्यातही त्याचा आक्रमक अंदाज दिसला होता. मात्र, चौथ्या सामन्यात त्याला फार काही करता आले नाही आणि तो 1 धावेवर बाद झाला.

भारताचा विजय

रायपूरला झालेल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. हे आमंत्रण स्विकारत भारताने २० षटकात 9 बाद 174 धावा केल्या.

भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 37 धावा, जितेश शर्माने 35 धावा आणि ऋतुराज गायकवाडने 31 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 154 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक 36 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 31 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणाला खास काही करता आले नाही.

आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी20 सामना 3 डिसेंबर रोजी बंगळुरूला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT