Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd T20I: विराट-रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची सूर्याला सुवर्णसंधी, 'हे' अनोखे शतक ठोकणार का?

WI vs IND, 2nd T20I: टी-20 क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अनोखे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी आहे.

Manish Jadhav

WI vs IND, 2nd T20I: टी-20 क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अनोखे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी आहे.

जर सूर्याला हे शतक पूर्ण करता आले तर तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकून या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना गयाना प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पहिला सामना 4 धावांनी गमावल्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात सूर्या क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी आला, पण तो आपली छाप सोडू शकला नाही.

सूर्याच्या या अनोख्या शतकाबद्दल सांगायचे झाल्यास, हा विक्रम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार ठोकण्याचा आहे.

सध्या या फॉरमॅटमध्ये सूर्याच्या नावावर 97 षटकार आहेत, जर आज त्याच्या बॅटमधून आणखी तीन षटकार आले तर तो टी-20 मध्ये षटकारांचे शतक पूर्ण करेल. हा टप्पा गाठणारा तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतरचा (Virat Kohli) तिसरा भारतीय ठरणार आहे.

दरम्यान, 8 फेब्रुवारी 2019 रोजी न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने (Rohit Sharma) कारकिर्दीतील 92 व्या सामन्यात 100 षटकार पूर्ण केले होते, तर विराट कोहलीने ही कामगिरी करण्यासाठी 104 सामने खेळले होते.

कोहलीने आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 100 वा षटकार ठोकला, जेव्हा त्याने त्याच्या 71व्या शतकासह शतकाचा दुष्काळ संपवला होता.

दुसरीकडे, सूर्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 49 T20 सामने खेळले आहेत आणि त्याच्याकडे अद्याप बराच वेळ आहे, परंतु या सामन्यातच SKY चे या विक्रमाकडे लक्ष असेल.

सूर्याने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3 शतकांसह 1696 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 45.84 आणि स्ट्राइक रेट 174.13 होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT