Suresh Raina Dainik Gomantak
क्रीडा

सुरेश रैना आता IPL खेळणार नाही, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Suresh Raina: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनाने आता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएललाही अलविदा केला आहे.

दैनिक गोमन्तक

International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनाने आता देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएललाही अलविदा केला आहे. रैनाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. म्हणजेच रैना आता आयपीएल खेळताना दिसणार नाही. रैनाने आपल्या ट्विटमध्ये चाहत्यांचे नेहमीच समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत.

दरम्यान, रैनाने ट्विट करत लिहिले की, 'आपल्या देशाचे आणि यूपी राज्याचे प्रतिनिधित्व करणे हा अत्यंत सन्मान आहे. मला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करायची आहे. मला @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @शुक्ला राजीव सर आणि माझ्या सर्व चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या क्षमतेवर असलेल्या अतूट विश्वासाबद्दल आभार मानायचे आहेत.'

दुसरीकडे, 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रैनाने आता देशांतर्गत क्रिकेटपासूनही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. रैना देश-विदेशात क्रिकेट लीग खेळत असला तरी यंदा रैना वर्ल्ड रोड सेफ्टी सीरिजमध्येही खेळणार आहे.

तसेच, आपल्या आयपीएल कारकिर्दीत रैनाने 205 सामने खेळले आणि यादरम्यान त्याने 5528 धावा काढल्या. रैना आयपीएलमध्ये (IPL) सीएसकेकडून खेळायचा. परंतु यावेळी त्याला CSK ने लिलावात खरेदी केले नाही. आता रैना रोड वर्ल्ड सेफ्टी सीरीज व्यतिरिक्त जगातील दुसऱ्या क्रिकेट लीगमध्ये भाग घेताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT