SURESH NIMISHA SECURES 15TH GOLD AT ASIAN PARA GAMES 2022 IN WOMENS LONG JUMP Dainik Gomantak
क्रीडा

ASIAN PARA GAMES मध्ये भारताच्या खात्यात 15 वे सुवर्ण, निमिषा सुरेशचे लांब उडीत पोडियम फिनिश

इंडोनेशियामध्ये झालेल्या 2018 च्या स्पर्धेत देशाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी झाली होती. त्यावेळी भारताने सर्वाधिक 72 पदके जिंकली होती.

Ashutosh Masgaunde

SURESH NIMISHA SECURES 15TH GOLD AT ASIAN PARA GAMES 2023 IN WOMENS LONG JUMP:

निमिषा सुरेशने बुधवारी चीनमधील हांगझोऊ येथे महिलांच्या T47 लांब उडी स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. यामुळे आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारताने 15 वे सुवर्णपदक आपल्या झोडीत टाकले.

निमिषा सुरेश चक्कनगुलपारंबिल हिने या स्पर्धेत 5.15 मीटरची सर्वोत्तम उडी मारून सुवर्णपदक जिंकले.

दरम्यान, भारताची कीर्ती चौहान याच स्पर्धेत ४.४२ मीटर्सची उडी घेऊन चौथी आली. या कामगिरीमुळे, हँगझोऊ आशियाई पॅरा गेम्समधील भारताच्या पदकांची संख्या आता 63 झाली आहे.

सोमवारी, प्रवीण कुमारने आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील पुरुषांच्या उंच उडी T46 फायनलमध्ये अव्वल स्थान मिळवून, 2.02 मीटरच्या प्रभावी उडीसह भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, उन्नी रेणूने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील भारताची कामगिरी दिलासादायक राहिली आहे. इंडोनेशियामध्ये झालेल्या 2018 च्या स्पर्धेत देशाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी झाली होती. त्यावेळी भारताने सर्वाधिक 72 पदके जिंकली होती.

आशियाई पॅरा गेम्स 2023 28 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT