Sunil Shetty reacts to KL Rahul's thunderous century Dainik Gomantak
क्रीडा

KL राहुलने झंझावाती शतक केल्यावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी इन्स्टाग्रामवर राहुलबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना 18 धावांनी जिंकला. लखनऊच्या या विजयात कर्णधार केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने फलंदाजी करताना शतक झळकावले. राहुलने 60 चेंडूत 103 धावा केल्या. केएलच्या या शतकानंतर सुनील शेट्टीने त्याचे कौतुक केले. राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनी इन्स्टाग्रामवर राहुलबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. (Sunil Shetty reacts to KL Rahul's thunderous century)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 181 धावाच करू शकला. लखनऊसाठी राहुलने 60 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा केल्या. त्याच्या या शानदार शतकानंतर सुनील शेट्टीने (Sunil Shetty) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राहुलचे (KL Rahul) कौतुक करताना त्यांनी लिहिले की, 'शांततेने मेहनत करा, यशाला आवाज करू द्या.'

विशेष म्हणजे राहुलचे हे आयपीएलमधील (IPL) तिसरे शतक आहे. याआधीही त्याने दोन शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये 100 सामने खेळणाऱ्या राहुलने आतापर्यंत एकूण 3508 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 28 अर्धशतके झळकावली आहेत. राहुलची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 132 धावा आहे. या स्पर्धेत त्याने 300 चौकार आणि 144 षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT