Famous Star Leaving WWE before Summerslam 2026 Dainik Gomantak
क्रीडा

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Famous Star Leaving WWE: WWE चा बहुचर्चित SummerSlam 2026 प्रीमियम लाईव्ह इव्हेंट अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कंपनीला मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

WWE चा बहुचर्चित SummerSlam 2026 प्रीमियम लाईव्ह इव्हेंट अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच कंपनीला मोठा धक्का बसला आहे. आगामी स्पर्धेत अनेक दिग्गज सुपरस्टार्स रिंगमध्ये उतरणार असताना, 27 वर्षीय युवा रेसलर सायरस हबीबी-लिकिओ (Cyrus Habibi-Likio) याने WWE सोडण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे रेसलिंग विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावरून दिली माहिती

सायरस हबीबी-लिकिओने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत WWE सोडत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्याने सांगितले की, आता कुटुंबाला अधिक वेळ देण्याची इच्छा असून व्यावसायिक आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

त्याचबरोबर NXT ब्रँडमध्ये मिळणारे मानधन अपेक्षेपेक्षा कमी असल्याचेही त्याने नमूद केले. त्यामुळे WWE मधील प्रवास थांबवून पुन्हा आपल्या रिअल इस्टेट व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.

WWE मधील प्रवास अपेक्षेइतका गाजला नाही

WWE मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सायरस हबीबी-लिकिओने डिव्हिजन-1 फुटबॉलमध्येही आपली छाप पाडली होती. त्याच्या अॅथलेटिक क्षमतेमुळे WWE मध्ये त्याला मोठी संधी मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. नोव्हेंबर 2025 मध्ये त्याने WWE सोबत तीन वर्षांचा करार केला होता.

मात्र, कंपनीकडून त्याला फारशा इन-रिंग संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीला अपेक्षित वेग मिळू शकला नाही. अखेर काही महिन्यांतच त्याने कंपनीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

SummerSlamपूर्वी WWE समोर आव्हाने

1 आणि 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या SummerSlam 2026 मध्ये अनेक मोठे सामने रंगणार आहेत. ब्रॉक लेसनर, रोमन रेन्ससह अनेक स्टार्सच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता आहे. मात्र, त्याआधीच एका युवा सुपरस्टारच्या निर्गमनामुळे WWE चर्चेत आली आहे.

अलीकडच्या काळात अनेक सुपरस्टार्सची एक्झिट

गेल्या काही महिन्यांत WWE मधून अनेक रेसलर्स बाहेर पडल्याची चर्चा आहे. WrestleMania 42 नंतर अनेक सुपरस्टार्स कंपनीपासून दूर झाले किंवा त्यांचे करार संपुष्टात आले. त्यामुळे WWE च्या रोस्टरमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

सायरस हबीबी-लिकिओच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे SummerSlamपूर्वी WWE ला आणखी एक धक्का बसला असून, पुढील काळात कंपनी युवा प्रतिभांना कशा प्रकारे संधी देते, याकडे आता रेसलिंग चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT