Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

Steve Smith: स्मिथने चौथ्यांदा जिंकला 'हा' मानाचा पुरस्कार; पाँटिंग, क्लार्कच्या यादीत समावेश

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने मोठा पुरस्कार नावावर करत पाँटिंग, क्लार्कची बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

Steve Smith: सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने २०२२ वर्षातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे ऍलेन बॉर्डर मेडल जिंकले आहे.

ऍलेन बॉर्डर मेडल जिंकण्याची स्मिथची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे चार वेळा हा पुरस्कार जिंकणारा तो तिसराच खेळाडू बनला आहे. यापूर्वी केवळ रिकी पाँटिंग आणि मायकल क्लार्कने चार वेळा ऍलेन बॉर्डर मेडल जिंकले आहे. स्मिथने यापूर्वी २०१५, २०१८ आणि २०२१ साली हा पुरस्कार जिंकला आहे.

स्मिथला हा पुरस्कार मिळवण्यासाठी १७१ मतं मिळाली. मतांच्या बाबतीत त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १४४ मतांसह ट्रेविस हेड राहिला. या पुरस्कारासाठीच्या मतदानाच्या कालावधीपर्यंत स्मिथने चार शतकांसह 1,524 धावा केल्या होत्या.

दरम्यान स्मिथ आता आगामी भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख खेळाडू असणार आहे. या मालिकेतून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे अन्य पुरस्कार

दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या २०२२ पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार डेव्हिड वॉर्नरने जिंकला, तर सर्वोत्तम पुरुष टी२० क्रिकेटपटूचा पुरस्कार मार्कस स्टॉयनिसने मिळवला.

त्याचबरोबर २०२२ मध्ये कसोटीत दमदार कामगिरी करणारा उस्मान ख्वाजाने सर्वोत्तम पुरुष कसोटीपटूचा शेन वॉर्न पुरस्कार आपल्या नावावर केला. त्याने 2022 वर्षात कसोटीमध्ये ११ सामन्यांमध्ये १०८० धावा केल्या आहेत.

बेथ मुनी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बेलिंडा क्लार्क पुरस्कार बेथ बुनीने जिंकला. हा पुरस्कार जिंकण्याची तिची ही दुसरी वेळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT