Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

डॉन ब्रॅडमननंतर अ‍ॅशेसच्या इतिहासात स्टीव्ह स्मिथने केली मोठी कामगिरी

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने केवळ 23 धावा केल्या. परंतु, इतक्या धावा करुनही स्मिथच्या (Steve Smith) नावावर एक मोठी कामगिरी जमा झाली आहे.

दैनिक गोमन्तक

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) जॅक लीच (Sydney Test). सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथने केवळ 23 धावा केल्या. परंतु, इतक्या धावा करुनही स्मिथच्या नावावर एक मोठी कामगिरी जमा झाली आहे. तो आता अ‍ॅशेस (Ashes Series) मालिकेच्या इतिहासातील अशा फलंदाजांपैकी एक बनला आहे, ज्यांच्या नावावर 3000 किंवा त्याहून अधिक धावा आहेत.

अ‍ॅशेसच्या इतिहासात 3000 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची संख्या फारशी नाही. या यादीत समावेश झालेला स्मिथ (Steve Smith) हा सहावा फलंदाज आहे. या 6 फलंदाजांपैकी 4 फलंदाज ऑस्ट्रेलियन आहेत, तर 2 इंग्लंडशी संबंधित आहेत.

स्टीव्ह स्मिथने 54व्या कसोटी डावात अ‍ॅशेसमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. त्याच्या एकूण धावांची संख्या 3017 आहे. यादरम्यान त्याने 11 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 61.57 आहे, जी अ‍ॅशेसमध्ये 3000 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रॅडमननंतर (Don Bradman) दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांनी अ‍ॅशेसमध्ये खेळल्या गेलेल्या 37 कसोटी सामन्यांच्या 63 डावांमध्ये 89.78 च्या सरासरीने 5028 धावा केल्या. यादरम्यान त्याने 19 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली. अ‍ॅशेसच्या इतिहासात ब्रॅडमन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

अ‍ॅशेसच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा (England) जॅक हॉब्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 41 कसोटी सामन्यांच्या 71 डावात 3636 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचे दोन माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ पुढील दोन क्रमांकावर म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बॉर्डरने अ‍ॅशेसमध्ये 3222 धावा केल्या आहेत तर स्टीव्ह वॉने 3173 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा डेव्हिड गॉवर 3037 धावांसह स्टीव्ह स्मिथच्या अगदी मागे पाचव्या स्थानावर आहे.

सध्या स्मिथ सहाव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण कारकिर्दीच्या अखेरीस तो अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकावरही पोहोचू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT