Sport
Sport Dainik Gomantak
क्रीडा

Sports: जर्मनीचा युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉलच्या उपांत्य फेरीत प्रवेश

दैनिक गोमन्तक

Quarterfinal: जर्मनीने 10व्यांदा महिला युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉलच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आठ वेळा विजेत्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाचा 2-0 असा पराभव केला. जर्मनीसाठी 25व्या मिनिटाला लियान मुघलने तर अलेक्झांड्रा पॉपने 89व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रियानेही गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण जर्मन बचावफळी भेदता आली नाही. 28 जुलै रोजी उपांत्य फेरीत जर्मनीचा सामना नेदरलँड आणि फ्रान्स यांच्यातील विजेत्याशी होईल.

सर्वाधिक आठ विजेतेपद पटकावणाऱ्या जर्मनीने यापूर्वी 2013 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. 2017 मध्ये जर्मनीचा संघ केवळ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकला होता. 2016 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर जर्मनीने प्रथमच एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

जर्मन संघ यापूर्वी 1989, 1991, 1993, 1995, 1997, 2001, 2005, 2009 आणि 2013 मध्ये उपांत्य फेरीत खेळला आहे. 1993 वगळता जर्मनीने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यावर जेतेपद पटकावले. 1993 च्या उपांत्य फेरीत जर्मनीचा इटलीकडून पराभव झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT