Rohit Sharma Dainik gomantak
क्रीडा

'हिटमॅन' मिशन आफ्रिकेसाठी सज्ज, सरावाचा व्हिडिओ केला शेअर

रोहित शर्माने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळली आहे...

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला तीन कसोटी आणि टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे कसोटी सामन्याने होणार आहे. रोहित शर्माही (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. रोहितने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. असं असलं तरी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पूर्णवेळ कर्णधार म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे. तसे, रोहित शर्माने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. यादरम्यान भारतीय संघाने 8 सामने जिंकले तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 साली UAE मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते. रोहित शर्माने गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाची चुणूक दाखवली आहे. पूर्णवेळ T20 कर्णधार म्हणून त्याने याआधीच भारताला मालिकेत 3-0 ने विजय मिळवून दिला होता. रोहित शर्माने स्वत: या तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने एकूण 159 धावांचे योगदान दिले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याचे वेळापत्रक

26-30 डिसेंबर १ली कसोटी, सेंच्युरियन 03-07 जानेवारी दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग 11-15 जानेवारी तिसरी कसोटी, केपटाऊन 19 जानेवारी 1 ली वनडे, पारल 21 जानेवारी 2 री वनडे, पारल 23 जानेवारी 3 री वनडेभारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याचे वेळापत्रक

26-30 डिसेंबर १ली कसोटी, सेंच्युरियन 03-07 जानेवारी दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग 11-15 जानेवारी तिसरी कसोटी, केपटाऊन 19 जानेवारी 1 ली वनडे, पारल 21 जानेवारी 2 री वनडे, पारल 23 जानेवारी 3 री वनडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT