cricket news

 

Dainik Gomantak

क्रीडा

क्रिकेट खेळाडूंचा मैदानाबाहेर वेगळाच वाद, तपासासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल

हे रेकॉर्डिंग एका वृत्तपत्राला कोणी पाठवले हे देखील अद्याप कळलेले नाही

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून संघाने अॅशेस मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना म्हणजेच बॉक्सिंग-डे कसोटी मेलबर्न येथे होणार आहे. दरम्यान, मैदानाबाहेर वेगळाच वाद सुरू आहे. 26 डिसेंबर रोजी नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. बॉक्सिंग-डे कसोटीचाही हा पहिला दिवस होता. या दिवशी एका वृत्तपत्राने दावा केला आहे की त्यांना एका महिलेचे कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूवर कोकेन घेतल्याचा आरोप आहे.

या रेकॉर्डिंगमध्ये महिला स्वत:ला एस्कॉर्ट सांगत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी प्रमुख सीन कॅरोल यांना तीने फोनवर ही माहिती दिली आहे. फोनवर बोलत असताना, महिलेने ऑस्ट्रेलियन खेळाडूवर कोकेन घेतल्याचा आणि कपड्यांशिवाय अनेक महिलांसोबत बाल्कनीत डान्स केल्याचा आरोप केला आहे. हे रेकॉर्डिंग एका वृत्तपत्राला कोणी पाठवले हे देखील अद्याप कळलेले नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने तपासासाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हे रेकॉर्डिंग आताचे नसून काही वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, खेळाडूवर लावण्यात आलेले आरोपही सिद्ध करणे कठीण होऊ शकते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले म्हणाले की, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात तथ्य नाही. सध्या पोलिसात (police) तक्रार करण्यात आली आहे. चौकशीनंतरच काही सांगता येईल.

अश्‍लील चॅटमुळे टीम पेनलाही कर्णधारपद गमवावे लागले होते, अलीकडेच अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनचा अश्‍लील चॅट आणि फोटो व्हायरल झाल्याने अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

यासोबतच कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडावे लागले. अॅशेस मालिकेत त्याच्या जागी पॅट कमिन्सकडे कमान सोपवण्यात आली होती. खरंतर, हे प्रकरण 2017-18 अॅशेस मालिकेदरम्यान होते. त्यानंतर टीम पेनने हे चॅटिंग देशातीलच महिला क्रिकेटपटूसोबत केले होते. तर टिम पेनने 2016 मध्ये बोनीसोबत लग्न केले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट (Cricket) बोर्डालाही टीकेला सामोरे जावे लागले. पेणवर बोर्डाने आतापर्यंत कोणतीही कारवाई (Action) केली नसून त्याला क्लीन चिट दिल्याचे लोक म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT