Sporting Club The Goa  Dainik Gomantak
क्रीडा

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने फुटबॉल स्पर्धेत नोंदवला पहिला विजय

लॉईड कार्दोझ (Lloyd Cardoz) याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर त्यांनी पुदुचेरीच्या कुप्पुराज एफसी संघास 3-2 फरकाने हरविले.

दैनिक गोमन्तक

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने (Sporting Club The Goa) नवी दिल्लीत सुरु असलेल्या क्लब फुटबॉल स्पर्धेत रविवारी पहिल्या विजयाची नोंद केली. लॉईड कार्दोझ याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर त्यांनी पुदुचेरीच्या कुप्पुराज एफसी संघास 3-2 फरकाने हरविले. स्पोर्टिंग क्लबला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बंगळूर एफसीविरुद्ध दोन गोलची आघाडी घेऊनही 3-2 फरकाने हार पत्करावी लागली होती. रविवारी कुप्पुराज संघाने आघाडी घेतली. मात्र नंतर स्पोर्टिंगने जम बसवत पूर्ण गुणांची कमाई केली.

के. राजागणपती याने 21 व्या मिनिटास कुप्पुराज संघाला आघाडी मिळवून दिली. लगेच 22 व्या मिनिटास लॉईडने स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिली. 23 व्या मिनिटास रोहित तोताड याने गोल करून गोव्याच्या संघास 2-1 असे वर्चस्व प्राप्त करून दिले. लॉईड कार्दोझने 38 व्या मिनिटास आणखी एक गोल केल्यानंतर 38 व्या मिनिटास ऑस्टिन जिजो याने कुप्पुराज संघाची पिछाडी 2-3 अशी कमी केली. कुप्पुराज संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. स्पर्धेत आता स्पोर्टिंगच्या लॉईड कार्दोझने तीन, तर रोहित तोताडने दोन गोल नोंदविले आहेत. स्पोर्टिंग क्लबचा पुढील सामना स्पीडफोर्स एफसी संघाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT