Team India BCCI
क्रीडा

SA vs IND: टी20 मालिका संपली, आता सुरु होणार वनडे मालिकेचा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

South Africa vs India: टी20 मालिकेनंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, ODI Series:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची टी20 मालिका संपली आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांनी एक-एक विजय मिळवला. त्यामुळे टी20 मालिका बरोबरीत सुटली.

आता या टी२० मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही वनडे मालिका 17 डिसेंबर पासून सुरु होणार असून अखेरचा सामना २१ डिसेंबर रोजी संपेल.

या मालिकेतील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता चालू होणार आहे, तर दुसरा आणि तिसरा सामना दुपारी 4.30 वाजता चालू होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गला होणार असून दुसरा सामना 19 डिसेंबर रोजी गेकेबेराला होणार आहे. तसेच तिसरा सामना 21 डिसेंबर रोजी पार्लला खेळवला जाणार आहे.

वनडे वर्ल्डकपनंतरची ही पहिलीच वनडे मालिका आहे. दरम्यान, या वनडे मालिकेसाठी दोन्ही संघांची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा अशा अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नवीन खेळाडू भारतीय संघात सामील आहेत.

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, या मालिकेतून वेगवान गोलंदाज दीपक चाहर बाहेर झाला आहे. कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी असल्याने तो या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागेवर आकाश दीपला संधी देण्यात आली आहे.

याशिवाय श्रेयस अय्यर देखील केवळ पहिल्याच वनडे सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. पहिल्या वनडेनंतर तो कसोटी मालिके तयारीसाठी कसोटी संघात सामील होणार असल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध नसेल.

आमने-सामने आकडेवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 91 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 38 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 50 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघ 56 वनडे सामने खेळला आहे. यातील 22 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 30 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर एक सामना बरोबरीत सुटलाय, तर 3 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत वनडे मालिकेचे वेळापत्रक -

  • 17 डिसेंबर - पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग (वेळ - दुपारी 1.30 वाजता)

  • 19 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, पोर्ट एलिझाबेथ (वेळ - दुपारी 4.30 वाजता)

  • 21 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, पार्ल(वेळ - दुपारी 4.30 वाजता)

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

  • दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनियल बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रिझा हेन्ड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन डर ड्युसेन, काईल वेरेयन, लिझार्ड विल्यम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Capital Gains Tax Removed: विदेशी गुंतवणूकदारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; सरकारी बॉन्ड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द, अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

दूषित अन्नामुळे दरवर्षी 86 कोटी लोक आजारी, 15 लाखांहून अधिक मृत्यू, लहान मुलांना 3 पट धोका; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

Vaidhriti Yog 2026: कुटुंबाची साथ सुटणार अन् बजेट कोलमडणार! जून महिन्यात 'डबल वैधृती योग'चा महाधोका; 5 राशींवर ओढवणार संकटांची मालिका

आयपीएल सट्टेबाजी ते दाऊदची धमकी... ललित मोदींच्या मुलाखतीने क्रिकेट जगतात खळबळ, केले अनेक मोठे खुलासे Watch Video

SAFF Championship: भारतीय महिला सहाव्यांदा अंतिम फेरीत, भूतानवर 1-0 फरकाने विजय; विजेतेपदासाठी गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान

SCROLL FOR NEXT