SL vs AUS  Dainik Gomantak
क्रीडा

SL vs AUS: श्रीलंकेने रचला इतिहास! शेवटच्या 3 षटकात केल्या 59 धावा

दासूनने डेथ ओव्हर्समध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 25 चेंडूत 54 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

दासून शनाकाने शनिवारी रात्री ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिस-या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात श्रीलंका संघाचा कर्णधार दासून शनाका याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. दासूनने डेथ ओव्हर्समध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 25 चेंडूत 54 धावा केल्या आहेत. (SL vs AUS History made by Sri Lanka 59 runs in the last 3 overs)

ज्याच्या मदतीने श्रीलंकेच्या संघाने हरलेला डाव पुन्हा विजयाच्या पथावर आणला. श्रीलंकेला शेवटच्या 30 चेंडूत विजयासाठी 76 धावांची गरज होती, त्यांचे पाच प्रमुख फलंदाज आधीच आऊट झाले. शेवटच्या 18 चेंडूतही लंकेला 59 धावांचे लक्ष्य गाठावे लागले. दासून शनाकाने येथून चौकार आणि षटकार ठोकायला सुरुवात केली आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

श्रीलंकेचा 3-0 असा पराभव निश्चित मानला जात होता, परंतु अखेरच्या पाच ओव्हरमध्ये कर्णधार दासुन शनाकाने सामन्याचे चित्र फिरवून ऑस्ट्रेलियाच्या हातातून विजय हिसकावून घेतला आणि सामन्यात चार गडी राखून विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 176 धावा केल्या. दासुन शानाकाला सामनावीर आणि अॅरॉन फिंचला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

डेव्हिड वॉर्नर 39 (33) आणि ऍरॉन फिंच यांनी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाला प्रथम फलंदाजी दिली. दोघांनी मिळून 43 धावा केल्या. फिंच 20 चेंडूत 29 धावांच्या धावसंख्येवर बाद झाला, त्यानंतर नवा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल नऊ चेंडूत केवळ 16 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 27 चेंडूत 37 धावा केल्या तर मार्कस स्टॉइनिसने 23 चेंडूत 38 धावा केल्या.

धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जोश हेझलवूड आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन गडी आऊट केले. पथुम निसांकाने 27 आणि चरित अस्लंकाने 26 धावांचे योगदान दिले आहे. कर्णधार दासुन शनाकाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबत 69 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला पहिला विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT