Shubman Gill Double Hundred Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: टीम इंडियाच्या प्रिन्सचा डबल धमाका! सचिन, सेहवाग, रोहित सर्वांनाच टाकलं मागे

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत द्विशतकी खेळी करत इतिहास रचला आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात हैदराबादला बुधवारी वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. या सामन्यात भारताचा सलामीवीर शुभमन गिलने द्विशतकी खेळी केली. यासह त्याने ऐतिहासिका कामगिरी केली आहे.

गिलने 145 चेंडूत द्विशतकी खेळी पूर्ण केली. याबरोबरच तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने वयाच्या 23 व्या वर्षीच हा कारनामा केला आहे.

त्याने हा विक्रम करताना ईशान किशनला मागे टाकले आहे. किशनने 24 व्या वर्षी द्विशतक केले होते. किशनने हे द्विशतक गेल्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते.

वनडेत सर्वात कमी वयात द्विशतकी खेळी करणारे फलंदाज

23 वर्षे 132 दिवस - शुभमन गिल (विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद, 2023)

24 वर्षे 145 दिवस - ईशान किशन (विरुद्ध बांगलादेश, चितगाव, 2022)

26 वर्षे 186 दिवस - रोहित शर्मा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, 2013)

द्विशतक करणारा आठवा खेळाडू

दरम्यान गिल वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो जगातील आठवा, तर भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वनडेत द्विशतके करण्याचा पराक्रम केला आहे.

यातील रोहितने तीनवेळा वनडेत द्विशतक केले असून वनडेत सर्वोच्च वैयक्तिक 264 धावा करण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच वनडेत ख्रिस गेल, फखर जमान आणि मार्टिन गप्टील यांनी देखील वनडेत द्विशतके केली आहेत.

भारताचा धावांचा डोंगर

गिलने केलेल्या द्विशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत 50 षटकात 8 बाद 349 धावा केल्या आहेत. गिलनंतर भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा रोहित शर्माने केल्या. त्याने 34 धावा केल्या.

तसेच हार्दिक पंड्याने 31 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणीही 30 धावांचा टप्पा ओलांडला नाही. न्यूझीलंडकडून हेन्री शिपली आणि डॅरिएल मिशेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT