Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: शुभमन गिलने रचला मोठा रेकॉर्ड, बाबर आझमला सोडले मागे!

Asia Cup 2023: आशिया कप 2023 मध्ये भारताने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

Shubman Gill: आशिया कप 2023 मध्ये भारताने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. नेपाळला पराभूत करुन भारताने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.

एवढेच नाही तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा त्यांच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसले, ज्याची अपेक्षा होती आणि ज्यासाठी हे दोन्ही खेळाडू ओळखले जातात. शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खूप संथपणे खेळताना दिसला होता.

दरम्यान, दोन्ही खेळाडूंनी नेपाळविरुद्ध अर्धशतके पूर्ण केली आणि यासह शुभमन गिलने एक नवा टप्पाही गाठला. त्याने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.

त्यात दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या नावाचाही समावेश आहे.

शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या

खरे तर, शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1500 धावाही पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वात जलद 1500 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. इतक्या धावा करण्यासाठी त्याने 29 सामने खेळले आहेत.

याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता, ज्याने 30 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर रायन टेन डोशेट आणि जॉर्ज बेली यांनी 32 सामन्यांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या.

बाबर आझमलाही (Babar Azam) इथपर्यंत पोहोचण्यासाठी 32 सामने खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेननेही एवढ्याच सामन्यांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या. आता या बाबतीत शुभमन गिल नंबर वन झाला आहे.

शुभमन गिलने नेपाळविरुद्ध अर्धशतक झळकावले, 62 चेंडूत 67 धावा केल्या

शुभमन गिलने 62 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी खेळली. त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला. यामुळेच शुभमन गिलला आयसीसी वनडे क्रमवारीतही चांगले स्थान मिळाले आहे.

बाबर आझम आज भलेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज असेल, पण शुभमन गिलही सातत्याने चांगली कामगिरी करत नंबर वनच्या दिशेने वाटचाल करत आहे. बाबर आझमचे रेटिंग 877 आहे. तर शुभमन गिलचे सध्याचे रेटिंग 743 आहे.

दरम्यान, नवीन रॅकिंग कधी जाहीर होणार, या खेळीचा त्याच्या रेटिंगवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल. आता पुढच्या सामन्यात शुभमन गिल पुन्हा पाकिस्तानशी (Pakistan) भिडणार आहे, जेव्हा दोन्ही संघ आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये 10 सप्टेंबरला भिडतील.

पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, पुढचा सामना पूर्ण खेळला जाईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT