Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 : श्रेयस अय्यरला केकेआरने बनवलं 'करोडपती'

श्रेयसला खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती.

दैनिक गोमन्तक

भारतीय मधल्या फळीतील फलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये जोरदार स्पर्धा होती. प्रत्येक संघ त्याला त्यांच्यात सामील करून घेण्यासाठी आतुर होता असे दिसत होते. श्रेयस (Shreyas Iyer) केवळ जबरदस्त फलंदाजच नाही तर एक चांगला कर्णधारही आहे आणि त्याने आयपीएलमध्येही हे सिद्ध केले आहे. (Shreyas Iyer Latest News)

यावेळच्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत श्रेयस अय्यरला १२ कोटी २५ लाखांना विकत घेतले आणि त्यात सामील झाले. श्रेयसच्या आगमनाने तो कदाचित केकेआरचा कर्णधारही असेल अशी अपेक्षा आहे. श्रेयस अय्यरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती आणि 10 मार्की खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मूळ किंमतही २ कोटी रुपये होती आणि मार्की खेळाडूंच्या यादीत त्याचाही समावेश होता. शमीवर बरीच बोली लागली, पण ती गती त्यात दिसली नाही, पण तरीही त्याला चांगली किंमत मिळाली. आयपीएलचा नवा संघ गुजरातने त्याला 6 कोटी 25 लाखांना खरेदी करण्यात यश मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT