Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: 'माहौल बदल दूंगा! श्रेयस अय्यरने KKR च्या चाहत्यांना दिलं वचन

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) नजर आता आयपीएल 2022 वर आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 वर आहे. श्रेयसने कोलकाता नाईट रायडर्सशी एका खास मुलाखतीत आयपीएल 2022 (IPL 2022) जिंकण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 16 फेब्रुवारीला श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले होते. श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यर सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. विशेष म्हणजे त्याच्या कर्णधारपदाची प्रतिभा सर्वांनाच ठाऊक आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या यशात अय्यरचा मोठा वाटा आहे. (Shreyas Iyer Promises KKR Fans To Win IPL 2022 Championship)

दरम्यान, श्रेयस अय्यर केकेआरशी बोलताना म्हणाला, 'मी मैदानात उतरण्यासाठी आतुर आहे. यावेळी मी केकेआरकडून खेळणार आहे. जेव्हाही मी या संघाविरुद्ध खेळलो तेव्हा चाहत्यांनी या संघावर खूप प्रेम केले. यावेळी मी या संघाचा कर्णधार असणार आहे. मी जबाबदारीसाठी घेण्यासाठी सक्षम आहे. मला यंदाची चॅम्पियनशिप जिंकायची आहे.'

केकेआरचे विजेतेपद हुकले

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2021 मध्ये तिसरे विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिले होते. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने केकेआरचा एकतर्फी पराभव केला होता. गेल्या मोसमात, केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन होता, जो फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला होता. मॉर्गनचे अपयश केकेआरला चांगलेच महागात पडले होते. आणि हेच कारण आहे की, फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. त्यानंतर मात्र त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT