Shashi Tharoor  Dainik Gomantak
क्रीडा

ICC World Cup 2023: 'अहमदाबाद भारतीय क्रिकेटची पंढरी बनतयं पण...', थरुर यांनी का व्यक्त केली निराशा

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. विश्वचषकाचे सर्व सामने देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील.

Manish Jadhav

ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. विश्वचषकाचे सर्व सामने देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील.

याच क्रमाने, टीम इंडियाचे चाहते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, ICC विश्वचषक 2023 च्या ठिकाणांची यादी जाहीर होताच काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी याबद्दल निराशा व्यक्त केली. कारण तिरुवनंतपुरमचे स्पोर्टहब या यादीतून गायब होते. थरुर म्हणाले की, अहमदाबाद भारतीय क्रिकेटची पंढरी बनत आहे.

दरम्यान, तिरुअनंतपुरमचे #SportsHub, भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे #WorldCup2023 फिक्स्चर यादीतून गायब झाल्याचे पाहून निराश झालो, असे थरुर म्हणाले. काँग्रेस खासदार थरुर यांनी ट्विट केले की, 'अहमदाबाद भारतीय क्रिकेटची पंढरी बनत आहे, पण एक-दोन सामने केरळला (Kerala) देता आले असते.'

दुसरीकडे, पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंह मीत यांनीही आयसीसी विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. मोहाली क्रिकेट स्टेडियम ठिकाणांच्या यादीतून वगळल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली.

राजकीय हस्तक्षेपामुळे पंजाबच्या मोहालीला स्पर्धेच्या यजमान शहरांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे मीत म्हणाले. पंजाब सरकार हा मुद्दा बीसीसीआयकडे (BCCI) मांडणार आहे.

ICC विश्वचषक 2023 चे वेळापत्रक

तसेच, यावर्षी आयसीसी विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाला, कारण पाकिस्तानने अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवला होता.

अलीकडेच, बीसीसीआयने ठिकाण बदलण्याची पाकिस्तानची विनंती धुडकावून लावली. दुसरीकडे, यंदाचा विश्वचषक हंगामात भारतीय संघाने शानदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT