Celebs Reactions Dainik Gomantak
क्रीडा

Celebs Reactions: महिला क्रिकेटपटूंबाबत BCCI चा ऐतिहासिक निर्णय, बॉलिवूड स्टार्सनी व्यक्त केला आनंद

BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत असे म्हटले जात होते, परंतु क्रीडा विश्वात त्यांची फी पुरुषांपेक्षा कमी आहे. पण, आता ही विषमता दूर करत बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटपटूंना आता कसोटीत 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये मॅच फी म्हणून मिळणार आहेत. हे पाहून आता बॉलिवूड (Bollywood) स्टार्सनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे सोशल मिडीयावर स्वागत केले आहे.

  • सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सच्या रिएक्शन

शाहरुख खानने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या ट्विटला रिट्विट करताना त्याने लिहिले, 'किती उत्तम फ्रंट फूट शॉट आहे. असा खेळ सर्वांसाठी सारखाच असेल. आशा आहे की हे पाऊल इतरांसाठी मार्ग खुला करेल.

तापसी पन्नूने ट्विट करून लिहिले, 'खूप मोठे पाऊल, सामान्य कामासाठी सामान्य पैसे. एक उत्तम उदाहरण मांडल्याबद्दल बीसीसीआयचे (BCCI) चे आभार. आम्ही तुम्हाला सांगतो की, तापसीने स्वतः देखील पडद्यावर एका खेळाडूची भूमिका साकारली आहे. यंदाच्या 'शाबाश मिठू'मध्ये तिने माजी भारतीय कर्णधार मिताली राजची भूमिका साकारली होती.

अक्षय कुमारने  (Akshay Kumar)  ट्विट करून लिहिले, 'हे वाचून मन प्रसन्न झाले, बीसीसीआय जय शाह हा एक चांगला निर्णय आहे. यामुळे महिला (Women) पुढील व्यावसायिक करिअर म्हणून क्रिकेटची निवड करतील. याशिवाय प्रीती झिंटा, आयुष्मान खुराना, दिया मिर्झा यांच्यासह अनेक कलाकारांनी ट्विट करून या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे आणि टाळ्यांच्या इमोजीद्वारे या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत अनुष्का शर्मा 'चकडा एक्सप्रेस' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात (Movie) ती माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Anushka Sharma

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT