Shahid Afridi  Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

Shahid Afridi Controversial Video: शाहिद आफ्रिदीचा एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Manish Jadhav

Shahid Afridi Controversial Video: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यावरुन सुरु असलेल्या वादात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उडी घेतली. त्याच्या एका वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत आधीच राजकीय तणाव असताना आफ्रिदीने भारताच्या नेतृत्वावर वादग्रस्त टिप्पणी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, मात्र अखेर नमते घेत त्यांनी खेळण्यास होकार दिला. याच वातावरणात आता आफ्रिदीच्या वादग्रस्त वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले.

शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदीने भारताच्या व्यवस्थेवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. "भारताला चार गुजराती चालवत आहेत, त्यापैकी दोन देश विकत आहेत आणि दोन देश चालवत आहेत," असे खळबळजनक वक्तव्य त्याने केले. खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना जर फक्त या चार जणांनाच खुश करायचे असेल, तर व्यवस्था नीट चालू शकत नाही, असेही त्याने पुढे म्हटले. आफ्रिदीचे हे वक्तव्य थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या संदर्भाने असल्याचे मानले जात असून याला भारतविरोधी आणि प्रक्षोभक ठरवून भारतीय चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना ग्रुप 'ए' मध्ये स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही संघांमधील थरार 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (ICC) हा सामना उत्पनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सामन्यापूर्वीच खेळाडूंच्या मैदानाबाहेरील अशा वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये कटुता वाढण्याची शक्यता आहे. आफ्रिदीने यापूर्वीही अनेकदा भारतावर (India) वादग्रस्त टिप्पणी केली आहे, मात्र जागतिक स्पर्धेच्या तोंडावर केलेले हे राजकीय विधान आता त्याला महाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT