Serena Williams Twitter /ANI
क्रीडा

Serena Williams Retires: प्रसिध्द टेनिसपटू सेरेना विल्यम्सने केली निवृत्तीची घोषणा

Serena Williams Retires: अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने निवृत्तीची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Serena Williams Retires: जगभरात टेनिसच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारी अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. 40 वर्षीय टेनिस दिग्गज इंस्टाग्रामवर लिहिले की, 'आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करतो, तेव्हा त्या वेळा नेहमीच कठीण असतात. मी टेनिसचा आनंद घेते. मात्र आता उलटी गिनती सुरु झाली आहे.'

सेरेनाने इन्स्टाद्वारे निवृत्तीची घोषणा केली

सेरेना विल्यम्सने (Serena Williams) इंस्टाग्रामवर पोस्ट केली. ज्यामध्ये तिने म्हटले की, 'आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करतो, तेव्हा त्या वेळा नेहमीच कठीण असतात. मी टेनिसचा आनंद घेते. मात्र आता उलटी गिनती सुरु झाली आहे.'

यूएस ओपनचे जेतेपद 6 वेळा जिंकले

सेरेना विल्यम्सने यूएस ओपनमध्ये चमकदार कामगिरी करताना आपल्या कारकिर्दीत एकूण 6 वेळा हे विजेतेपद पटकावले होते. तिने 1999, 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. त्याच वेळी, ती 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती देखील राहिली आहे. मात्र, काही काळापासून ती दुखापतींनी त्रस्त होती. टेनिस (Tennis) कोर्टवरील तिचा फॉर्म साथ देत नव्हता. तिच्या खराब फॉर्ममुळे तिच्या निवृत्तीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT