Second T20 match against Australia today India have a chance to win the match and and the series
Second T20 match against Australia today India have a chance to win the match and and the series 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी ट्वेन्टी-२० आज ; सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची भारताकडे संधी

गोमन्तक वृत्तसेवा

सिडनी :  ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या दुसऱ्या ट्‌वेन्टी-२० सामन्यातही बाजी मारून मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे, परंतु जडेजाची फलंदाज म्हणून उणीव कोण भरून काढणार, हा मोठा प्रश्‍न भारतीय संघासमोर आहे. दुखापतीमुळे जडेजा या मालिकेतून बाहेर गेला आहे.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि एक ट्‌वेन्टी-२० असे चार सामने झाले आहेत. यातील अखेरचे दोन सामने भारताने जिंकले, पण यामध्ये जडेजाची फलंदाजी निर्णायक ठरली होती. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आक्रमक नाबाद ६६; तर पहिल्या ट्‌वेन्टी-२० सामन्यात नाबाद ४४ धावा केल्या होत्या.


प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावर जडेजाच्या या स्फोटक खेळी निर्णायक ठरल्या होत्या, त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात जडेजाची भरपाई करणारी खेळी कोणाला तरी करावी लागणार आहे. जडेजाच्या ‘कन्कशन सब्टीट्यूट’ नियमाचा भारताने फायदा घेतला, त्यामुळे पराभवाची झळ लागलेला ऑस्ट्रेलिया संघ डिवचला गेला आहे. उद्या अधिक आक्रमकपणे ते भारतीय संघावर आक्रमण करण्याची शक्‍यता आहे.


सिडनी अपयशी मैदान

या दौऱ्यात सिडनी हे मैदान भारतीय संघासाठी प्रामुख्याने गोलंदाजांसाठी अपयशी ठरलेले आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने याच मैदानावर झाले होते. पहिल्या सामन्यात ३७४; तर दुसऱ्या सामन्यात ३८९ धावा भारतीय गोलंदाजांनी दिल्या होत्या. उद्याचा ट्‌वेन्टी-२० सामनाही सिडनीत होणार असल्यामुळे गोलंदाजांना सावध राहावे लाहणार 
आहे.


महम्मद शमीऐवजी शार्दुल?


रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित ट्‌वेन्टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही आणि त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने प्रभावी मारा केला होता. 

फलंदाजाकडून अपेक्षा


रोहित शर्मा नसला तरी भारतीय संघात आयपीएल गाजवलेले फलंदाज आहेत, पण केएल राहुलचा अपवाद वगळता कोणालाही प्रभाव पाडता आलेला नाही. आता फॉर्म आणि क्षमता सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे. शनिवारी वाढदिवस साजरा करणारा शिखर धवन, कर्णधार विराट कोहली यांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएलचा स्टार सूर्यकुमारऐवजी संधी देण्यात आलेला मनीष पांडे यालाही आपली निवड सिद्ध करावी लागणार आहे.

युझवेंद्र चहलवर लक्ष


लेग स्पिनर युझवेंद्र चहल सिडनीच्या याच मैदानावर फारच महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे कॅनबरातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते. कॅनबरातच शुक्रवारी झालेल्या पहिल्या ट्‌वेन्टी-२० लढतीत अनपेक्षितपणे खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने कमाल करत तो सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता. त्यामुळे उद्या तो कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज

 पहिले दोन एकदिवसीय सामने याच मैदानावर झाले आहेत. खेळपट्टी अपेक्षेपेक्षा संथ, पण जम बसल्यावर फटकेबाजीसाठी उपयुक्त. पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांत दोन्ही संघांकडून तीनशेच्या पलीकडे धावा.

थेट प्रक्षेपण : दुपारी १.४० पासून

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Watch Video: पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात; पाक लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT