Sarfaraz Khan Dainik Gomantak
क्रीडा

Sarfaraz Khan: भारतीय संघाच्या सिलेक्टर्सनं पुन्हा केलं इग्नोर, सर्फराजनं व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्यानंतर सर्फराज खानने एक पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Sarfaraz Khan Social Media Post: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (23 जून) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यातील कसोटी मालिकेत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

या कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा, उमेश यादव अशा अनुभवी खेळाडूंना बाहेर करण्यात आले, तर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले. दरम्यान, या कसोटी मालिकेसाठी मुंबईचा फलंदाज सर्फराज खानलाही संधी मिळेल, असे अंदाज अनेकांनी व्यक्त केले होते.

मात्र त्याला भारताच्या संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापही त्याला भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पण त्याला या मालिकेसाठी संधी न दिल्याने मात्र अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनीही बीसीसीआय निवड समीतीला फटकारले आहे.

अशातच सर्फराजने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या बराच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ त्याच्या रणजी ट्रॉफीमधील कामगिरीची हायलाईच आहे. या व्हिडिओतून तो निवडकर्त्यांना त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीची आठवण करून देत असल्याचा कयास अनेकांनी म्हटले आहे.

तसेच त्याने 'लक्ष्य' चित्रपटातील गाणे बॅकग्राउंडला लावत नेट्समधील खेळपट्टीचा फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने एकच प्रेम (One Love) असे कॅप्शनही लिहिले आहे.

त्याच्या या स्टोरीबद्दल सध्या बरीच चर्चा होता आहे. खरंतर सर्फराज गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान दिले जावे, अशी मागणीही बऱ्याच दिवसांपासून होत आहे. सर्फराजने गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Sarfaraz Khan

25 वर्षीय सर्फराजने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात 6 सामन्यांत खेळताना 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आत्तापर्यंतची कामगिरीही चांगली झाली आहे.

त्याने आत्तापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 13 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT