Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson Video: मोठ्या मनाचा सॅमसन! संधी मिळाली नाही, पण माणूसकी दाखवत जिंकली मनं

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी संजू सॅमसनला भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नाही, पण त्याने दाखवलेल्या माणूसकीने अनेकांची मने जिंकली आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanju Samson Video: न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान, या सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला अंतिम 11 जणांच्या भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, असे असतानाही सॅमसनने त्याच्या एका कृत्यातून अनेकांची मने जिंकली आहे. त्याने दाखवलेल्या माणूसकीबद्दल त्याचे सध्या कौतुकही होत आहे.

सॅमसन (Sanju Samson) पहिल्या वनडे सामन्यात चांगला खेळला होता. मात्र, असे असतानाही त्याला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आल्याने भारतीय संघव्यवस्थापनावर टीका होत आहे. याचदरम्यान सॅमसनने मात्र ग्राऊंड्समनसाठी मदतीचा हात पुढे केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

झाले असे की सेडन पार्क, हेमिल्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे दरम्यान सातत्याने पावासाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे ग्राऊंड्समनच्या कामांमध्ये वाढ झाली होती. यादरम्यान सॅमसनही त्यांना मदत करताना दिसला. त्याचा ग्राऊंडस्टाफला मदत करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सॅमसन सध्या चांगल्या लयीत असल्याचे दिसले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत 36 धावांची खेळी केली होती. पण दुसऱ्या वनडेत त्याच्याऐवजी भारतीय संघात (Team India) अष्टपैलू दीपक हुडाला संधी देण्यात आली होती.

इतकेच नाही, तर दुसऱ्या वनडे दरम्यान सूर्यकुमार यादव देखील ग्राऊंड्स स्टाफबरोबर काम करताना दिसला होता.

दुसरा सामना रद्द

दुसरा वनडे सामन्यात केवळ 12.5 षटकांचा खेळ होऊ शकला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. नाणेफेकीलाही पावसामुळे उशीर झाला होता. पण सामना सुरू झाल्यानंतरही पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे अखेर भारताने 12.5 षटकांत 1 बाद 89 धावा केल्या असताना सामना रद्द करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT