Sania Mirza-Shoeb Malik Divorce Dainik Gomantak
क्रीडा

Sania Shoaib Divorce: शोएब मलिकसोबतच्या अफेअरवर अभिनेत्री आयशा उमरने सोडले मौन, म्हणाली...

Sania Mirza: प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे.

दैनिक गोमन्तक

Sania Shoaib Divorce: प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात कटुता असल्याच्या बातम्या येत आहेत. बातम्यांनुसार, नात्यात कटुता येण्याचे कारण शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबतचे अफेअर आहे. शोएबसोबत पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव समोर येताच आता आयशा उमरने अफेअरच्या बातम्यांवर मौन सोडले आहे. आयशाने तिच्या वक्तव्यात शोएबसोबतच्या नात्याची हकीकत सांगितली आहे. यानंतर तिचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयशा उमरने अफेअरवर ही माहिती दिली

सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचे कारण पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरला सांगितले जात आहे. बातम्यांनुसार, शोएबचे आयशासोबत अफेअर सुरु होते, त्यामुळे शोएब आणि सानियामध्ये अंतर निर्माण झाले होते. त्याचवेळी या रिपोर्ट्सवर मौन तोडत आयशाने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की- 'शोएब मलिकसोबतचे माझे हे फोटोशूट पूर्वीचे आहे. हे फक्त एक प्रोफेशनल फोटोशूट होते. जर कोणाचे अफेअर असेल तर ते या प्रकारचे फोटोशूट ऑनलाइन पोस्ट करणार नाहीत. मी विवाहित पुरुषाशी संबंध ठेवण्याचा विचारही करु शकत नाही. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटादरम्यान (Divorce) हे फोटो मीडियाने चुकीच्या पद्धतीने वापरले होते.'

आयशा-शोएबचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते

शोएब मलिक आणि आयेशा उमरच्या (Ayesha Omar) अफेअरच्या बातम्यांना त्यांच्या रोमँटिक फोटोशूटमुळे उधाण आले होते. या फोटोशूटमध्ये दोघेही कॅमेर्‍यासमोर रोमँटिक होताना दिसले होते. या फोटोंमध्ये शोएब कधी आयशासोबत पूलमध्ये दिसला तर कधी तिचे केस ग्रूम करताना दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपई बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती पहा...

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT