Sandhya Melashimi Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या संध्याला दुहेरी किताबाची संधी

तिने 35+ वयोगटातील महिला एकेरी व दुहेरीत अंतिम फेरी गाठली. या वयोगटात ती देशातील अव्वल मानांकित महिला बॅडमिंटनपटू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याची माजी राज्य बॅडमिंटन विजेती संध्या मेलाशीमी (Sandhya Melashimi) हिला अखिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत (badminton tournament) दुहेरी किताबाची संधी आहे. तिने 35+ वयोगटातील महिला एकेरी व दुहेरीत अंतिम फेरी गाठली. या वयोगटात ती देशातील अव्वल मानांकित महिला बॅडमिंटनपटू आहे.

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. स्पर्धेत विविध वयोगट उपांत्यपूर्व फेरी गाठल्यामुळे संध्या हिच्यासह संदीप व कमलेश हे कांजी बंधू, विशाल वेर्णेकर व अमित कक्कर, विल्फ्रेड जॅकिस, सी. के. अयूब यांचे स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक सीनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्रता निश्चित झाली आहे. कांजी बंधू, तसेच विशाल व अमित यांनी 40+ वयोगटातील पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. 50+ वयोगटात ऑस्कर सिल्वेरा व आग्नेल डायस, विल्फ्रेड जॅकिस व राजपाल सिंग यांनी, 55+ वयोगटात सी. के. अयुब व झेवियर राफेल यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT