Sai Sports Club Kishor Petkar
क्रीडा

साई क्लबच्या विजयात निखिल चमकला

ब गट स्पर्धा : क्रिकेट क्लब ऑफ आल्तिनोवर सहा विकेट्सनी मात

दैनिक गोमन्तक

पणजी : निखिल दिवगीकर याच्या नाबाद शतकाच्या बळावर साई स्पोर्टस क्लबने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) उत्तर विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ आल्तिनो संघाला सहा विकेट्स राखून हरविले. सामना गुरुवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. (Sai Sports Club recorded a great victory)

क्रिकेट (Cricket) क्लब ऑफ आल्तिनोने प्रथम फलंदाजी (batting) करताना ६ बाद २४६ धावा केल्या, नंतर निखिलच्या शतकामुळे साई क्लबने ४ बाद २५० धावा करून सामना जिंकला. निखिलने ८८ चेंडूंत १४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १०७ धावा केल्या. त्याने नेहाल मांद्रेकर (५४) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय (Victory) निश्चित केला. आल्तिनो संघाच्या उत्कर्ष (६१) व आशुतोष नाटेकर (५५) यांची अर्धशतके झाकोळली गेली.

संक्षिप्त धावफलक : क्रिकेट (Cricket) क्लब ऑफ आल्तिनो : ४० षटकांत ६ बाद २४६ (विठ्ठलराज सांगोडकर २२, आशुतोष नाटेकर ५५, उत्कर्ष ६१, गौरांग धुरी ४८, नीलांग नाईक नाबाद ३८, नेहाल मांद्रेकर १-२९, मनोज हळदणकर २-५५, विनायक मुळगावकर १-१४, महेश कोरगावकर १-३३)

पराभूत वि. साई स्पोर्टस क्लब : ३४.३ षटकांत ४ बाद २५० (रोहित सोपान १२, राजेश वायंगणकर ४१, संदेश पांड्रे १२, निखिल दिवगीकर नाबाद १०७, नेहाल मांद्रेकर ५४, परशुराम हसमणी १-५३, सिताराम मयेकर ३-४२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT