राष्ट्रीय बॅडमिंटनपटू सादिक
राष्ट्रीय बॅडमिंटनपटू सादिक  Dainik Gomantak
क्रीडा

बॅडमिंटन प्रशिक्षक अभ्यासक्रमात सादिकचे यश

दैनिक गोमन्तक

पणजी: साखळी येथील सादिक अत्तार महंमद याने बॅडमिंटन (Badminton) प्रशिक्षक अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. राष्ट्रीय क्रीडा संस्थेतर्फे (NIA) पंजाबमधील जालंधर येथे घेण्यात आलेला NIS प्रशस्तिपत्रक अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला.

सादिक हा गोव्याचा राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू आहे. त्याने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, तसेच खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत (India National Championship) गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरात तो हंगामी प्रशिक्षक या नात्यानेही कार्यरत आहे.

बॅडमिंटनमधील NIA प्रशिक्षक अभ्यासक्रमात यश प्राप्त केल्याबद्दल गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सादिकचे अभिनंदन केले आहे. NIS प्रशिक्षक अभ्यासक्रमात सफल ठरल्यामुळे सादिकला आता प्रशिक्षक या नात्याने कारकीर्द करणे सोईस्कर ठरणार आहे, असे हेबळे यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT