Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

सचिन तेंडुलकरला मिळू शकते बीसीसीआयमध्ये मोठी जाबाबदारी

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी संकेत दिले आहेत की तेंडुलकरही बोर्डामध्ये नवी जाबाबदारी पार पडताना दिसू शकतो.

दैनिक गोमन्तक

जगात मास्टर बास्टर म्हणून ओळख असलेलला सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जाबबदरी मिळू शकते. तेंडुलकरसोबतच सौरव गांगुली (Sourav Ganguly) , राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतातील क्रिकेटमधील सर्वात मोठे चेहरे आहेत. सध्या गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, तर द्रविडला नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय लक्ष्मणला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख करण्यात आले आहे. मात्र सचिन हा एकमेव उरला आहे, ज्याला आतापर्यंत बीसीसीआयमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. परंतु यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी संकेत दिले आहेत की तेंडुलकरही बोर्डामध्ये नवी जाबाबदारी पार पडताना दिसू शकतो.

एका अहवालानुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की द्रविडची (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून आणि लक्ष्मणची एनसीए प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तेंडुलकरलाही बोर्डात महत्वाची जबाबदारी मिळू शकते. यासाठी 'क्रिकेटचा देव' मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याच शाह यांनी म्हटल आहे. सचिनला निवड समितीमध्ये एक महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचवेळी सचीनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेल नाही. पण बीसीसीआय (BCCI) सचिव भारताच्या महान फलंदाजाचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

माजी कर्णधार गांगुली यांनी 2019 मध्ये बीसीसीआयचे 39 वे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या आधी सिके खन्ना बीसीसीआयचे अध्यक्ष होते. 2017 ते 2018 या काळात त्यांनी हे पद भूषवले. याआधी अनुराग ठाकूर हे पद सांभाळत होते. गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे दुसरे कर्णधार आहेत. त्यांच्या आधी विजयनगरचे महाराज कुमार हे पहिले कर्णधार होते ज्यांना या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सचिनने गांगुलीचे बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले होते, तो म्हणाला,"ज्या प्रकारे त्याने आपले क्रिकेट खेळले, ज्या प्रकारे त्याने देशाची सेवा केली, त्याचप्रमाणे आपली जबाबदारी सांभाळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT