Sachin Tendulkar At Mopa Airport Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar: मोपावर सचिनला पाहताच तो धावला अन् गडबडीत असताना सुद्धा सचिनने चिमुकल्याची पूर्ण केली इच्छा

कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी सचिनने आपला वाढदिवस साजरा केला.

Pramod Yadav

Sachin Tendulkar At Mopa Airport: क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याचा 50 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. वयाचं अर्धशतक साजरे करण्यासाठी त्याने देवभूमी कोकणात पोहोचला होता. कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी सचिनने आपला वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंब कोकणात होते. दरम्यान, वाढदिवसानंतर मुंबईकडे परतत असताना मोपा विमानतळावर एका चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली व सर्वांची मने जिंकली.

Sachin Tendulkar At Mopa Airport

कोकणातून मुंबईकडे परण्यासाठी सचिन उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल झाला. विमान पकडण्यासाठी घाई गडबडीत असणाऱ्या सचिनची सावंतवाडीतील ओम अमोल टेंबकर या चिमुकल्याने भेट घेतली.

ओमने सचिनकडे सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सिझनच्या बॉलवर ऑटोग्राफ करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, सचिनने घाई गडबडीत असताना सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली. सचिनच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Sachin Tendulkar At Mopa Airport

दरम्यान, 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन गेले दोन दिवस वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वाढदिवस साजरा करण्यासह, सचिनने आपल्या कुटुंबासह पर्यटनाचा आस्वाद लुटला. दरम्यान, आज मुंबईला परत जात असताना तो मोपा विमानतळावर आला अन् त्याची भेट चिमुकल्या ओमसोबत झाली.

सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गातील भोगवे समुद्रकिनारी असलेल्या साध्या हॉटेलमध्ये साजरा केला. दोन दिवसांपूर्वी सचिन कुटुंबीयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

SCROLL FOR NEXT